चांदवड तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी,पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी,
ज्ञानेश्वर पोटे
भाटगांव- चांदवड तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी,पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, सरकारला जाग आणण्यासाठी “चांदवड तालुक्यातील पाणी प्रश्न संघर्ष समिती” दिनांक ७/१०/२०२४ वार सोमवार रोजी एक दिवसीय लाक्षणिक लक्षवेधी उपोषण करणार आहे. स्थळ-शासकीय विश्राम गृहाच्या समोर, गणूर चौफुली चांदवड येथे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे विनंती वजा आवाहन पाणी प्रश्न संघर्ष समिती तर्फे करण्यात आले आहे.
मागील महिन्यामध्ये नार-पार गिरणा प्रकल्पाला माननीय राज्यपाल साहेबांनी मंजुरी दिली व राज्य शासनाने तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन निविदा सुद्धा काढलेली आहे. त्यामध्ये देवळासह संपूर्ण खान्देशचा समावेश केला आहे,परंतु त्यात चांदवड तालुक्याचा समावेश झालेला नाही.
याच नदी जोड प्रकल्पा सोबत पार – गोदावरी प्रकल्पाचा ही समावेश होता, त्याला मात्र अद्याप मंजुरी नाही.
हथियाड धरणाची पाणी परवानगी सन 2012 मध्ये मिळाली असून ही अद्याप हथियाड धरण झाले नाही. या सारख्या प्रमुख मागण्यांसह इतर ही पाणी प्रश्नां संबंधित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसाचे लक्षवेधी उपोषण आयोजित केलेले असून, सर्व शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती चांदवड तालुका पाणी प्रश्न संघर्ष समिती कडून करण्यात आली आहे.