जिल्हास्तरीय पावरलिफ्टिंग स्पर्धेत के. के. वाघ ज्युनिअर कॉलेजची चमकदार कामगिरी
प्रतिनिधी . ज्ञानेश्वर भवर

महाराष्ट्र युवक व क्रीडा सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी नाशिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय १९ वर्ष आतील मुले व मुली पावरलिफ्टिंग स्पर्धेत के. के. वाघ ज्युनिअर कॉलेज काकासाहेबनगरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी आपल्या नावाची नोंद केली. कु. पवार तनुजा चंद्रकांत हिची मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळवत नाशिक येथे होणाऱ्या विभागीय पातळीवर निवड झाली, तर कु.संस्कृती विलास चव्हाण हिने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. मुलांच्या गटात विद्यार्थी साहिल शेख याने द्वितीय क्रमांक मिळविला. त्याबद्दल के. के. वाघ ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, श्री. शरद कदम सर यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गणेश आवारे, योगेश पुंड, किरण शिंदे, संदीप शिंदे, खराक भाग्यश्री, निकिता उगले, कांचन जाधव, माधुरी गवांदे, चेतन महाले यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक प्रदीप राठोड व आकाश अहिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.