भाटगांव तालुका चांदवड येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड तालुक्यातील भाटगांव येथे माननीय आमदार डॉ.श्री.राहुल दादा आहेर यांच्या प्रयत्नातून साकारलेले विविध पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण व मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन दिनांक ७/१०/२०२४ वार सोमवार रोजी भाटगांव येथील सर्व ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी भाटगांव येथील बौद्ध विहार भूमिपूजन, सुमरे वस्ती ते परसुल शिव रस्ता भूमीपूजन आणि संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळील भाटगांव जोपूळ रस्ता इत्यादी कामांच्या भूमिपूजन होऊन तसेच हनुमान मंदिर भाटगांव येथील सभागृहाचे लोकार्पण माननीय आमदार डॉ.श्री.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते व
भाटगांव ग्रामपंचायत सरपंच सौ.हिराबाई पगार, सरपंच श्री.किरण भवर, ग्रामपंचायत सदस्य श्री.रावसाहेब पोटे,श्री.अशोक गवळी, श्री.निखिल वैराळ, सौ.सोमवंशी, सौ.मंगल सोनवणे, सौ. सोनाली मोरे आदी सर्व सदस्य आणि भाटगांव येथील बहुसंख्य ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.