मा जी प सदस्य डी के जगताप आणि लासलगाव कृ ऊ बा समितीच्या मा सभापती सौ सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांच्या तब्बल एक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर कोटमगाव शिवारात असलेल्या भगरी बाबा नगर मध्ये नवीन विद्युत डीपी बसवण्याचे काम अखेर चालू….
मुख्य संपादक राहुल वैराळ

कोटमगाव शिवारात असलेल्या भगरी बाबा नगरमध्ये येथील रहिवाशांना शेतपंपाच्या डीपी वरून घरगुती जोडण्यात देण्यात आल्या होत्या परंतु वेळोवेळी विजेच्या तारा तुटणे वादळ वारा यामुळे वारंवार वीस पुरवठा खंडित होणे यासारख्या घटना मागील काही काळात अनेक वेळा घडत होत्या याबाबत अनेक वेळा महावितरण कंपनीकडे तक्रार दाखल करून देखील कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना गैर सुविधा सामना करावा लागत होता
गावासाठी एक वेगळी डीपी बसवावी यासाठी सौ सुवर्णाताई जगताप यांनी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री प्रवीण सोनवणे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन या भागात डीपी बसवण्याचे काम सुरू करण्यात आले.
गावकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि कोटमगाव चे मा सरपंच तुकाराम गांगुर्डे ,मा चेअरमन भाऊसाहेब गांगुर्डे, राजेंद्र जाधव ,रोहित पठारे ,मनोज शिंदे ,दीपक डगळे ,रामदास मालुंजकर ,रणधीर मोरे ,रहाणे तसेच इतर सर्व ग्रामस्थांनी श्री डी के नाना जगताप व सौ सुवर्णाताई ज्ञानेश्वर जगताप यांचे आभार मानले.