आज चांदवड विभागीय कार्यालयातील बाह्य स्रोत कर्मचारी यांना विज सुरक्षा साधनांचा वापर व सुरक्षा उपाय योजना याविषयी मार्गदर्शन
मुख्य संपादक राहुल वैराळ

चांदवड -विभागीय कार्यालयातील बाह्य स्रोत कर्मचारी यांना विजसुरक्षा साधनांचा वापर व सुरक्षा उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम चांदवड विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता केशव काळु माळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास अतिरिक्त कार्यकारी अभियंता राठोड साहेब प्रशिक्षण केंद्र एकलहरै यांनी सुरक्षा पर विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच त्यांच्यासोबत प्रशिक्षण केंद्र एकलहरै येथील शेख साहेब यांनी देखील मार्गदर्शन केले व चांदवड योग्य कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री सुनिल रहिज साहेब यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक योग्य प्रकारे मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यक्रमाच्या वेळी बाह्य स्रोत कर्मचारी यांना मुख्य कार्यालयाच्या आदेशाने त्यांचे वेतन हे एचडीएफसी बँकेत जमा करण्याबाबत जे काही परिपत्रक आले होते त्या संदर्भात एचडीएफसी बँक मुंबई शाखा चे प्रमुख शेख साहेब यांनी देखील कर्मचाऱ्यांना पगार खाते संदर्भात सविस्तर माहिती दिली व मोठ्या प्रमाणात बाह्य कर्मचारी यांनी एचडीएफसी बँकेत यावेळी आपल्या खाते उघडले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश जोशी उच्च स्तर लिपिक मासे यांनी केले सदर कार्यक्रमास चांदवड विभागीय कार्यालय अंतर्गत असणारे बाह्य स्रोत
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधना वापरणे विषयक शपथ घेण्यात आली.