लासलगाव महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, ता. २३ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर, श्री.मोहन बागल, श्री.रामसिंग वळवी, श्री.प्रभाकर गांगुर्डे, श्रीमती लता तडवी, श्री.दत्तात्रय गायकवाड इ. उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावरील उपस्थितांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतात श्री.उज्वल शेलार म्हणाले की आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यात अनेक क्रांतिकारक, देशभक्तांचा फार मोठा वाटा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यातलेच एक मोठे नाव. इंग्रजांशी लढण्यासाठी नेताजींनी आझाद हिंद फौज स्थापन करत “जय हिंद” चा नारा देत देशभर जनजागृती केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुनिल गायकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.