
सिन्नरला – येथील नाथपंथी समाजाच्यावतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्रावन मासच्या पवित्र पावन पर्वाचे औचीत्य साधत देवाधीदेव महादेव यांना अती प्रिय असणारा व समस्त विश्वातील प्राणीमात्रास जलद गतीन फल प्रदान करणारा अत्यंत लाभकारी असा महारुद्राभिषेक व नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा सामुहीक सहस्र नाम जप तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम सोमवारी (दि. २८) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत नाथपंथी समाज बबन रघुनाथ इंगळे बाबा सामाजीक सभागृह सिन्नर – शिर्डी हायवे लगत, सिन्नर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती देविदास लाड यांनी दिली.
वेदमुर्ती स्वामी सोमनाथजी जंगम गुरूजी यांच्या हस्ते
सकाळी १० ते ११ वा. यावेळेत वृक्षारोपण करण्यात येणार असून त्यानंतर दुपारी १ ते ३ वा. यावेळेत महा रुद्राभिषेक होणार आहे. महारूद्राभिषेक पूजेस आवश्यक असणारी साधन सामग्री भाविकांनी सोबत घेवून यावयाची आहे. त्यात १ शिवलींग, १ गडवा, फुलपात्र, चमचा, आसन, २ नागळेली पान, १ सुपारी ताम्हन (शिवलींग ताम्हनात ठेवून अभिषेक करण्यासाठी), पंचामृत, पान, फुल, बेल, हळद, कुंकू, भस्म, गंध, अंक्षदा, धुप, दिप, अगरबत्ती, निरंजनी, कापुर, घंटी, शंख (उपलब्ध असेल तर), खडीसाखर / गुळाचा खडा, प्रसाद रूपात कोनतेही फळ किंवा पेढा व रू. १०१/- दक्षिणा शुल्क अधिक माहितीसाठी देविदास विश्वनाथ लाड मो. ८८८८८२५३५३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “