सोग्रस ता.चांदवड येथील आकाशवीर गृप अर्थात एव्ही ब्रॉयरल कंपनीचे अंडी आणि कोंबडी जाणार आफ्रिकेत…!!!
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – पोल्ट्री व्यवसायात मक्तेदारी असलेल्या अमेरिकन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नाशिकच्या एव्ही बॉयरल या कंपनीने नवीन ब्रीड (अनुवंश )विकसित केले आहे. त्याचा आफ्रिका खंडातील ‘सेनेगल’ या देशातील सोरा होल्डिंग या कंपनीबरोबर सामंजस्य करार नुकताच सह्याद्री फार्म नाशिक येथे पार पडला. साधारणतः ७५० कोटी रुपयांच्या या करारामुळे एव्ही बॉयलर ने नवीन उच्चांक गाठत पोल्ट्री (कुक्कुटपालन) क्षेत्रात आपला नवा ठसा उमटविल्याची माहिती, कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रीकृष्ण गांगुर्डे (दादा )यांनी नाशिक येथे दिली. सोरा होल्डिंग कंपनीचे अध्यक्ष मिस्कोम माउ, ‘अँडफीड’ चे संचालक मॅलिक सेने, डॉक्टर रत्नाकर पाटील, मानसी गांगुर्डे व उपाध्यक्ष डॉक्टर इलीमाने डायने या वेळी उपस्थित उपस्थित होते. आफ्रिका खंड हा ब्रॉयलर पक्षी व अंड्यांचा मोठा ग्राहक देश आहे. यासाठी त्यांना अमेरिका व युरोपीय देशातून होणाऱ्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यावर उपाय म्हणून त्यांनी भारतीय पोल्ट्री उत्पादनास प्राधान्य दिले आहे. याचाच भाग म्हणून आफ्रिकेतील सेनेगल या देशातील सोरा होल्डिंग कंपनी यांनी नाशिक जिल्ह्यातील सोग्रस येथील ‘आकाशवीर ग्रुप’ तथा एव्ही ब्रॉयलर कंपनी बरोबर द्विपक्षीय सामंजस्य करार केला. यात 70 टक्के वाटा एव्ही ब्रॉयलर चा,तर 30 टक्के वाटा सोरा होल्डिंग कंपनीचा असेल. यामुळे भारतीय पोल्ट्रीच्या व्यापारास चालना मिळणार आहे.
एव्ही ब्रॉयलर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रीकृष्ण गांगुर्डे (दादा) म्हणाले की, एव्ही बॉयलर्स ही कंपनी भारतीय मालकीची असून तिच्याशी जोडले गेलेले 2000 पेक्षा अधिक शेतकरी सद्यस्थितीत दरमहा 35 ते 40 लाख पक्षांचे कुक्कुटपालन व्यवसाय करतात. या माध्यमातून 500 पेक्षा अधिक व्यापारी व व्यावसायिकांची साखळी जोडली गेलेली आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये अंडी आणि एक दिवसाच्या पिल्लांचा पुरवठा करत असते. कंपनी यापूर्वीपासून आशिया व आफ्रिकन देशांमध्ये अंडी व कोंबड्यांची निर्यात करीत असल्याचे माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, एव्ही बॉयलर्स ने भारतीय सीमा ओलांडत आपला व्यवसाय तुर्कस्तान, नायजेरिया, केनिया , सेनेगल यासारख्या देशांमध्ये व्यापार करीत चांगली ओळख निर्माण केली आहे. यापुढेही इराक, येमेन यासारख्या इतर 12 देशांमध्ये कंपनीचा विस्तार वाढविण्याचा मानस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी व्यक्त केला.