
गेल्या सहा महिन्यापासून लासलगाव येथील पोस्ट ऑफिस मध्ये आधार कार्ड नोंदणी केंद्र हे नादुरुस्त प्रिंटर अभावी बंद होते त्यामुळे लासलगाव व परिसरातील नागरिकांना आधार कार्ड दुरुस्तीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्याबाबत दिनेश जोशी यांनी विभागीय कार्यालय मालेगाव येथे माहिती अधिकारात माहिती मागितली असता सदर आधार कार्ड दुरुस्ती केंद्र हे सहा महिन्यापासून प्रिंटर अभावी बंद होते व सदर लासलगाव पोस्ट कार्यालय मध्ये नवीन प्रिंटर उपलब्ध करून देण्यात येऊन दिनांक 18/ 10 2022पासून लासलगाव पोस्ट ऑफिस येथील आधार नोंदणी केंद्र पुनश्च एकदा नोंदणीसाठी नागरिकांना उपलब्ध झालेले आहे त्यामुळे लासलगाव परिसरातील नागरिकांना आधार कार्ड नोंदणी तसेच दुरुस्तीसाठी होणारी वन वन थांबलेली आहे