SDRF जवान प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या दोन तरुणांना बाहेर काढतांना शहिद
ज्ञानेश्वर पोटे

संगमनेर पोलीस उपविभागातील अकोले तालुक्यातील सुगाव येथे प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह शोधण्यासाठी आलेल्या एसडीआरएफ जवानांची बोट पाण्यात बुडाल्याने या पथकातील psi प्रकाश नाना शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राहूल गोपीचंद पावरा आणि पोलीस कॉन्स्टेबल वैभव सुनिल वाघ यांना आपले प्राण गमवावे लागले.
मृत्युमुखी पडलेल्यांपैकी चौघांचे मृतदेह मिळाले असून दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.या सर्व मृत जवानांना शासकीय मानवंदना देऊन महसुल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, राज्याच्या पोलीस महासंचालक सौ. रश्मी शुक्ला, परीक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महासंचालक श्री. बी.जी. शेखर, जिल्हाधिकारी श्री. सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सोमनाथ वाघचौरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.