
-नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सोमवार (ता. 20 )रोजी शांततेच्या वातावरणात पार पडली असून मतमोजणी येत्या 4 जूनला होणार आहे तोपर्यंत मतदारांनी दिलेले मत ज्या ईव्हीएम मशीन मध्ये बंद आहेत त्या ईव्हीएम मशीन अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वेअर हाऊसिंग स्ट्रॉंग रूम मध्ये मंगळवारी 21 पहाटे पोहोचले असून ते सील करून ठेवण्यात आलेले आहेत . या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा सध्या खूप महत्त्वाची असल्यामुळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तेथील बंदोबस्ताच्या नियोजनाची पाहणी करून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. यावेळी परिमंडळ दोनच्या उपआयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख ,चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रियाज शेख ,सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर, उपनिरीक्षक विजय लोंढे ,यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. नाशिक व दिंडोरी मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम भोवतीच्या सुरक्षेसाठी तीन स्तर उभारण्यात आले आहेत. प्रथमृ स्तराची सुरक्षा “सीआरपीएफ” च्या जवानाकडे असून यासाठी दोन तुकडे तैनात आहेत, दुसऱ्या स्तराची सुरक्षा “एसआरपीएफ” जवानांकडे असून तिसऱ्या स्तराची सुरक्षितता “एसआरपीएफ” जवानाकडे आहे .सीआरपीएफ व एसआरपीएफ च्या तुकड्यांच्या सशस्त्र बंदोबस्त असेल, तिसऱ्या व बाहेरील सुरक्षा स्तराच्या सुरक्षेसाठी स्थानिक शहर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे .पोलिसाचे सुरक्षा कडे ओलांडण्याची कुणालाही परवानगी नाही. अंबड पोलिसांकडून दिवस रात्र बाहेरून गस्त राहील तसेच पोलिसाच्या पथकाकडे बाहेरील सुरक्षेची जबाबदारी सुद्धा आहे.