ताज्या घडामोडी

पुणेगांव- दरसवाडी-डोंगरगांव पोहोच कालव्याचा मार्ग बदलण्याच्या मार्गावर शेतकरी आक्रमक

ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड-येवला तालुक्यांसाठी बहुचर्चित पुणेगांव दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे विस्तारीकरण आणि अस्तरीकरणाचे काम सुरू असताना या कालव्याचे पाणी अचानक मध्येच भाटगांव मार्गे नदीमध्ये टाकून डायरेक्ट दरसवाडी भोयगांव धरणात टाकण्याचा विचार प्रशासन करत आहे.भाटगांव मार्गे दरसवाडी धरणात पाणी टाकण्यास परसुल येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला,कारण कालव्याचे पहिल्यापासून पाणी परसुल गावातील नदीत टाकून नंतर भोयगांव-दरसवाडी धरणात टाकून पुढे येवलासाठी जात होते पण अस्तरीकरणाच्या कामात पाण्याचा मार्ग बदलून भाटगांव मार्गे डायरेक्ट भोयगांव-दरसवाडी धरणात टाकण्यासाठी प्रशासनाने सिमेंट पाईप भाटगांव येथे कालव्यावर आणल्यानंतर परसुल ग्रामस्थांनी त्यास विरोध करून माननीय आमदार श्री.राहुल दादा आहेर यांना प्रत्यक्ष जागेवर येऊन चर्चा करण्याची मागणी केली,त्याप्रमाणे आज आमदार राहुल दादा आहेर हे पुणेगांव-दरसवाडी पोहोच कालव्या वरती आले,असता शेतकऱ्यांनी एकच मागणी केली की,याआधी ज्याप्रमाणे परसुल गावातील नदीतून पाणी दरसवाडी-भोयगांव धरणात टाकत होते,त्याचप्रमाणे आताही टाकण्यात यावे पण,प्रशासनाने सिमेंटचे पाईप टाकून पाणी वळवण्याचा जो प्रयत्न चालू आहे,तो तात्काळ थांबवण्यात यावा आणि कालव्याची दिशा पूर्ववत ठेवण्यात यावी.यामध्ये पाटबंधारे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की,परसुल नदीमध्ये पाणी टाकताना ज्यावेळेस कालवा पूर्ण क्षमतेने भरतो त्यावेळेस आपत्कालीन परिस्थितीच्या वेळेस येथे सिमेंटचे पाईप टाकण्यात येत आहे.त्यांना दरवाजा ठेवण्यात येणार आहे,आपत्कालीन परिस्थितीमध्येच ते दरवाजे उघडून भाटगांव मार्गे दरसवाडी-भोयगांव धरणात पाणी सोडण्यात येईल.आणि इतर वेळी परसुल गांव मार्गेच पाणी धरणात जाणार असे आश्वासन पाटबंधारे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले होते, परंतु शेतकऱ्यांनी त्यांची काही एक ऐकता माननीय आमदार राहुलदादा आहेर यांना पाचारण करून प्रत्यक्ष जागेवर पाटबंधारे अधिकारी,माननीय आमदार आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाली त्या चर्चेमध्ये श्री.आमदार राहुल दादा आहेर यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना सांगितले की तुम्ही जे सिमेंट पाईपला दरवाजे टाकणार आहेत,ते फक्त आपत्कालीन परिस्थिती वेळेसच उघडले गेले पाहिजे इतर वेळेस पाणी रेगुलर परसुल नदीत केले पाहिजे त्याप्रमाणे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी आमदारांना लेखी देण्याचे आश्वासन दिले. तर माननीय आमदारांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून आपत्कालीन परिस्थितीमध्येच सिमेंटच्या पाईपचे दरवाजे उघडले जातील असे लेखी घेण्याचे मान्य केले व शेतकऱ्यांना तसे आश्वासन दिले. याप्रसंगी श्री.संजय निकम,श्री.आर.के.मामा, श्री.समाधान आहेर, श्री.नवनाथ ठोंबरे, विक्रम निकम ,ज्ञानेश्वर बरकले ,सोपान बरकले, सोपान सोनवणे ,शंकर शिंदे ,नामदेव सोनवणे, दीपक निकम ,राजू वाघ, हौशीराम सोनवणे आधी बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.