कु. श्रावणी धनंजय गायकवाड जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर

वैनतेय माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज निफाड विद्यालयाने विद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय ज्युनियर कॉलेज व माध्यमिक विद्यालय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या.त्यात माणिक रघुनाथ मढवई माध्य .विद्यालय कोटमगाव विद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्रावणी धनंजय गायकवाड हिने प्रथम क्र.मिळविला. वैनतेय विद्यालयाचे माजी प्राचार्य मा.व्यवहारे सर यांच्या हस्ते प्रशस्थीपत्रक देऊन तिचा गौरव करण्यात आला.श्रावणी गायकवाड हिस मराठी विषय तज्ञ शिक्षक श्री गलांडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या ह्या यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष श्री.अमोल मढवई ,सचिव श्री.प्रतिक मढवई,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मढवई मॅडम सरपंच कडाळे मॅडम,उपसरपंच श्री.योगेश पवार,शिक्षक श्री. गलांडे ए .पी.,श्री.केदारे एम टी सर.श्री गांगुर्डे पी.के.सर,श्री कदम सर शिक्षकेतर कर्मचारी,श्री.दिवटे सर,श्री. देवडे सर.विद्यालयाच्या आजी,माजी विद्यार्थ्यांनी श्रावणीच्या उत्तुंग यशाचे कौतुक करून अभिनंदन केले.