पारोळा जि. जळगाव येथे एका कार (स्कोडा) ने भरधाव बेधुंद पणे ड्रायव्हिंग करत मातंग समाजातील तीन तरुणांना चिरडले.
प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की पारोळा जिल्हा जळगाव येथे बेधुंद अवस्थेत असलेल्या गाडी स्कोडा कार मालकाने गाडी चालवत तीन मातंग समाजातील मुलांचा प्राण घेतला पारोळा पोलीसांनी कार चालक मालक यांना कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता अटक न करता सोडून दिले. याप्रसंगी. नाशिक जिल्हा नेते नानासाहेब खंडाळे. धुळे जिल्ह्यातील मातंग समाजाचे नेते. बंडू नाना गांगुर्डे.. संतोष भाऊ मरसाळे. पारोळा येथील मातंग समाजाचे नेते. बापू साहेब मरसाळे. व पारोळा येथील सर्व समाज बांधव माता बघिणी यांनी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सानप यांना व तपास अधिकारी पी.एस.आय.वसावे यांना जाब विचार त धारेवर धरले, जोपर्यंत आरोपी अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, पोलीस ठाण्यात प्रेत आणुन त्या ठिकाणी सर्व समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आरोपींना भुसावळ येथुन अटक करण्यासाठी पोलीस कर्मचारी व समाजाचे नेते बापू मरसाळे. व बंडू नाना गांगुर्डे हे पोलीस गाडी घेऊन गेले व मध्यस्थीने समाजाची समजूत करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्या नंतर रात्री दिड वाजता आरोपींना पारोळा पोलीसांनी भुसावळ येथून घेऊन आले