चांदवड तालुक्यातील अत्यंत दुर्दैंवी घटना, परिसरात पहिल्यांदाच बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – चांदवड तालुक्यातील भडाणे येथील श्री.रामदास सिताराम आहेर
वय 45 हे गट नंबर 83 लगतच्या भडाणे रायपूर शिव रस्त्याने रात्री साडेनऊच्या दरम्यान मजुरी करून घरी परत येत असताना बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
श्री.सचिन भाऊसाहेब आहेर हे त्या शिव रस्त्याने गाडीवरती जात असताना त्यांना अचानक रक्त दिसले व झाडांमध्ये आवाज आला त्यांनी गाडीचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने चमकावला असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी आवाज देऊन परिसरातील नागरिकांना बोलावले तर त्या ठिकाणी रामदास आहेर हे जखमी अवस्थेत निदर्शनास आले. श्री.रघुनाथ सुखदेव वाघ यांनी ही माहिती पशु प्राणी मित्र श्री.भागवत झाल्टे यांना दिली व त्यांनी तत्काळ वन विभागाला बोलवून पुढील प्रक्रिया सुरू केली. मृतदेह रात्री पंचनामेसाठी शासकीय रुग्णालय चांदवड येथे नेण्यात आले. वन विभागाकडून पंचनामा करून पुढील तपास चालू आहे,अशी सविस्तर माहिती भागवत झाल्टे वन्यप्राणी पशु मित्र यांनी दिली.