
नाशिक मधून एक धक्कादायक बातमी येत आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील राहुड घाटात एसटी बसचा भिशन अपघात झाला आहे. एसटीचे टायर फुटल्याने ती ट्रकला जाऊन धडकल्याने हा अपघात झाला असून त्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे .अपघाताची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. चांदवड जवळ राहुड घाटात हा अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले . अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली .सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाल्याची बातमी आहे .जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक बातमी समोर आली आहे .