ताज्या घडामोडी
माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे द्वितीय पुण्यतिथी साजरी—–
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर

कोटमगाव येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माणिक रघुनाथ मढवई यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रथमतः मढवई सरांच्या पवित्र प्रतिमेचे पूजन सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व कु समीक्षा गांगुर्डे ,समीक्षा पवार,वैभवी केंदळे,दर्शन केंदळे,यश डगळे,श्वेता पगारे,कोमल कराटे,गायत्री भालेराव,प्राप्ती गांगुर्डे,यांनी केले तर ,श्री.गलांडे सर श्री केदारे सर श्री गांगुर्डे सर,श्री कदम सर,श्री दिवटे सर,श्री देवढे सर यांनी सरांबद्दलचे अनुभव, व सरांचे कार्य भाषणातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गांगुर्डे सर यांनी भाषणातून सरांचे विचार पिढ्यानपिढ्या रुजवण्यासाठी आव्हान केले. सूत्रसंचालन श्री गलांडे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी सहभागी होते.