भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने T20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
नाशिक प्रतिनिधी

टी – 20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी केवळ एकच महिना उरलेला आहे .त्याआधी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने टी – 20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा रोहित शर्मा कॅप्टन असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने काही नवीन खेळाडूंना स्थान दिले आहे. तसेच हार्दिक पांड्या उपकर्ण धार म्हणून काम करताना दिसणार आहे. संघामध्ये दोन यष्टीरक्षकाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसग हे दोघे आहेत. राहुल गेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाचा भाग होता, परंतु या वेळेस केएल राहुल ला संघातून वगळण्यात आले आहे. टि -20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघ – रोहित शर्मा , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली ,सूर्यकुमार यादव . ऋषभ पंत ( यष्टीरक्षक) , संजू सॅमसंग ( यष्टीरक्षक ) हार्दिक पांड्या, (उपकर्णधार) शिवम दुबे, रवींद्र जडेजा ,अक्षर पटेल , कुलदीप यादव ,युजेवेंद्र हर्षदीप सिंह, जसप्रीत बुमराह , मोहम्मद सिराज , आणि शुभम गिल , रिंकू सिंग , खलील अहमद ,आवेश खान यांना राखीव ठेवण्यात आले आहे . हार्दिक ची निवड झाली तर शिवम रिंकू पैकी एकालाच संधी मिळेल अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती, त्याचवेळी यशस्वी आणि शुभमन या दोघांपैकी एकाला संधी द्यावी लागली, निवड कर्त्यांनी शुभमन पेक्षा यशस्वी ला प्राधान्य दिलेले आहे.