गोंदे, ता. इगतपुरी शिवारात अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद
मुख्य संपादक राहुल वैराळ

गोंदे, ता. इगतपुरी शिवारात अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद ०३ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जीवंत काडतूसे हस्तगत
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी आदेशीत केल्याप्रमाणे, जिल्हयातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अवैधरित्या घातक शस्त्रे / अग्नीशस्त्रे बाळगणारे व विक्री करणारे संशयीतांची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत स्थागुशाचे पथकास सूचना देण्यात आलेल्या आहे.
त्यानुसार दिनांक २२/११/२०२२ रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अंमलदार वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असतांना पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही संशयीत इसम हे गोंदे एम. आय. डी. सी. परिसरात अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे बाळगुन काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याचे समजले वरून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी संशयीत इसम नामे १) अनिल राजेंद्र सातपुते, वय ३३, रा. गोंदे दुमाला, ता. इगतपुरी, व २) अमोल सुकदेव भोर, वय २८, रा. गोंदे दुमाला, ता. इगतपुरी यांना सापळा रचुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात ०३ देशी बनावटीचे पिस्टल, ०४ जिवंत काडतूसे, ०१ रिकामे काडतूस मिळून आले. सदर इसम हे विनापरवाना बेकादेशीररित्या घातक अग्नीशस्त्रे कब्जात बाळगतांना मिळून आले असून त्यांचेविरूध्द वाडीव-हे पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी अनिल सातपुते हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी खंडणीसह दरोडा, दंगा-दुखापत असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती माधुरी कांगणे-केदार यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोहवा प्रविण मासुळे, पोना सचिन पिंगळ, विश्वनाथ काकड, मंगेश गोसावी यांचे पथकाने सदरची कामगिरी केली आहे. अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांवर आगामी काळात देखील अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे.