श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेंनके यांनी दिले सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टला निवेदन
संपादक सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड

पंधरा दिवसांत दखल न घेतल्यास उपोषण सप्तशृंगगडावर सुविधांचा अभाव; देवीभक्तांमध्ये नाराजीचा सूर
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी गड सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु या ठिकाणी असलेल्या सुविधांच्या अभावामुळे देवीभक्तांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. भाविकांना पंधरा दिवसांच्या आत उत्तम सुविधा न मिळाल्यास, आमरण उपोषणाचा पवित्रा सप्तशृंगी गडावरील चालतं-बोलतं मदत केंद्राचे संस्थापक अध्यक्ष संदीप बेनके यांनी घेतला आहे.
सप्तशृंगी मातेच्या पाचशे पायऱ्या चढून मंदिरामध्ये जावे लागते या दर्शनाच्या पायऱ्यांवरती कुठेही शौचालय नसल्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध महिला याची गैरसोय होते, तसेच बाळांना स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष नसल्यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यासह शिवालय तलावाचे सुशोभीकरण करणे, साधू-महंत यांना गाभारा दर्शन देणे, पायी येणाऱ्या भाविकांसाठी निवारा शेड करणे, तसेच देवी संस्थान एक व्यक्तीला रूम उपलब्ध करून देत नसल्यामुळे भाविकांच्या निवासासाठी बेडची व्यवस्था करणे, भगवती मंदिर गाभारा पूर्वीप्रमाणेच करणे, पायरीवर नारळ कापूर लावण्याची जुनी प्रथा सुरू करणे, रामटप्पा ते मंदिर परिसरात कर्तव्यदक्ष अधिकारी नेमणे, पहिली पायरी ते उतरत्या पायरी मार्गावर पिण्याच्या पाण्याची सुविधा करणे, पहिली पायरी ते पाटील चौक या ठिकाणी बॅरिकेट्स करणे (फक्त यात्रा कालावधी पुरते).
देवी संस्थान मार्फत गावाच्या वेशीवर प्रवेशद्वार करणे, स्थानिक आदिवासी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करणे,
बेरोजगार युवकांना नोकर भरती प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्यात यावे, गरजू ग्रामस्थ व कर्मचारी यांना वैद्यकीय कारणास्तव तत्काळ मदत, म्हणून दोन लाख रुपयांपर्यंत मदत करावी, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी, नव्याने मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाबाबत ग्रामस्थ, पुरोहित व भाविकांना विश्वासात घेण्यात यावे
स्थानिक कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत घ्यावे, ग्रामस्थांना महापूजा, आरती, देणगी हॉल भाडे यामध्ये ७५ टक्के सवलत
द्यावी, ट्रस्ट घटनेत बदल करून, विश्वस्त समिती सदस्यांची संख्या अकरा करून, त्यात स्थानिकांना विश्वस्त पदावर घ्यावे, अनेक प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थान यांना देण्यात आले व व सदर मागण्यांची पूर्तता न झाल्यास ट्रस्ट कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सदिप बेनके यांनी निवेदनात म्हटले आहे हे निवेदन देता वेळेस सामाजिक कार्यकर्ते व चालत बोलत मदत केंद्राचे संस्थापक संदीप बेनके धनंजय गायकवाड वसंत साळुंखे उपस्थित होते