अवैद्य धंद्याविरुद्ध पोलीस अधीक्षक आक्रमक अभोणा हद्दीत १ लाख ६४ हजाराच्या मुद्देमालसह गुटखा जप्त
अभोणा प्रतिनिधी, खुशाल देवरे

आज (दि.२५ )रोजी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिरवाडे येथे रचलेल्या सापळ्यात अवैध गुटख्याबाबत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. केलेल्या कारवाईत ७९ हजार ६०० रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा व व्ही-१ नावाचे तंबाखू पाऊच, सिल्वर रंगाची मारुती ओमनी कार( MH15 FN2505)रुपये मूल्य ८०हजार,एक व्हिवो मोबाईल रुपये मूल्य ५ हजार असा एकूण १ लाख ६४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनासह तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आले असून यात खेडगाव ता. दिंडोरी येथील राहुल बाळू उगले, वय ३२,कैय्युम पांजवानी, राहणार चिखली, गुजरात, तसेच अशोक पवार राहणार नवागावं, सापुतारा या आरोपीना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.जिरवाडे चेकपोस्ट येथे वाहनांची तपासणी करीत असताना, सदरील वाहन वेगाने निघून जात असताना पाठलाग करून पकडण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्याविरोधात सुरु केलेली मोहीम अधिक गतिमान होत असल्याचे यनिमित्ताने दिसून येत आहे.
दरम्यान गुजरात राज्याला जोडून असलेल्या कळवण, दिंडोरी, बागलाण येथे चोरट्या मार्गाने अवैध वाहतूक नियमितपणे होत असते, जिरवाडे येथून धनोली मार्गे सापुतारा येथे जाणारा रस्ता तर अवैध वाहतुकीसाठी मुख्य रस्ता असल्याचे सर्वश्रुत असताना अभोणा पोलीस ठाण्याअंतर्गत कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे का बसविले जात नाहीत याबाबतही सर्व सामान्य नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जातो आहे.