
नाशिक – प्राचीन काळापासून आपल्या देशात गाईला विशेष महत्त्व आहे. त्यातच जगातील सर्वात लहान गाय म्हटल्या वर सर्वांनाच या गाई बद्दल उत्सुकता असणार आहे .आपल्या देशात अनेक प्रकारच्या जातीच्या गायी आहेत, त्यातील पुंगनूर ही गाय जगातील सर्वात लहान गाय आहे .ही गाय तिच्या लहान आकारासाठी जगभर प्रसिद्ध आहे .ती आकारानेच नव्हे तर तिच्या दुधामुळे सुद्धा प्रसिद्ध आहे .देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक ही गाय बघण्यासाठी येतात . व खरेदी सुद्धा करतात. ही गाय दिसायला जरी लहान असली तरी तिची वैशिष्ट्ये इतर काही जातीच्या गायीपेक्षा वेगळे आहे. तिचे दूध खूप चांगले असते . तिच्या लहान उंचीमुळे तिचे देखभाल करणे खूप सोपे आहे. पुंगनूर गायीची भारतीय जात मुळची आंध्र प्रदेशातील आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील लिंगमपट्टी गावात चार एकरावर पसरलेल्या गोठ्यात पुंगनूर गायचे संवर्धन प्रामुख्याने आंध्र प्रदेशात केले जाते . पुंगनूर गाय जितकी लहान असेल तितकी तिची किंमत जास्त आहे. साधारणपणे पुंगनूर गाईची एक जोडी एक लाख ते पंचवीस लाख रुपये इतकी आहे . पुंगगनूर गायीचे मूड दक्षिण भारत आहे ते आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आढळते .तेथील पुंगनुर या ठिकाणावरून या गायला हे नाव पडले आहे .या गाईच्या दुधात आठ टक्के फॅट असलेले औषधी गुणधर्म देखील भरपूर असतात, तर सामान्य गाईच्या दुधात फक्त तीन ते 35 टक्के फॅट असते. लहान आकाराची तुंगनूर गाय दर दीवशी दोन ते पाच लिटर दूध देते. त्या बदल्यात फक्त पाच किलो चारा द्यावा लागतो. ही जात अवर्षण प्रतिरोधक देखील आहे .ज्यामुळे ती दक्षिण भारतातील सर्व क्षेत्र तसेच दिल्ली,, उत्तर प्रदेश, बिहार ,गुजरात ,राजस्थान, आणि मध्य प्रदेशासाठी उपयुक्त आहे .संशोधनानुसार पूंगनूर गाय ही एकमेव छोटी जात नाही तर केरळची वेचुर काय देखील लघु गाईच्या यादीत समाविष्ट आहेत .वेतुर गायची उंची केवळ तीन ते चार फूट आहे परंतु पुंगनूर गायीची उंची त्याहूनही कमी म्हणजे एक ते दोन फूट आहे.