
नाशिक – येत्या मंगळवारी (दि. ४) रोजी दिंडोरी आणि नाशिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे .त्यादरम्यान पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये ,यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. मतमोजणी केंद्रासह बाहेरील परिसरात 500 हुन अधिक सशस्त्र पोलीस तैनात असणार आहेत. यावेळी परवानगी व प्राधिकार पत्र असणाऱ्यांनाच मतमोजणी केंद्रामध्ये किंवा परिसरात प्रवेश असणार आहे. मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव , वाहतूक व मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी ,परिवहनंडळ एकचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण , मोनिका राऊत यांच्या निर्देशानुसार सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मतमोजणी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार परिमंडळ दोनच्या हद्दीतील सातपूर अंबड पोलीस चौकी, एमआयडीसी पोलीस चौकी ,इंदिरानगर ,उपनगर, नाशिक रोड,, देवलालीकँम्प आणी पोलीस मुख्यालयासह गुन्हे शाखा , अभियोग कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा, गुंडाविरोधी पथक, महिला सुरक्षा विभाग , टी ए डब्ल्यू वाहतूक शाखा, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक, अमलदार , साध्या वेषातील पोलीस, स्ट्रॉ ंग रूम वेअर हाऊस येथे तैनात असणार आहेत