76 व्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी लाल परी चा भीषण अपघात, जीवितहानी नाही पण, पंधरा पेक्षा जास्त प्रवासी जखमी
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- यावल आगाराची एसटी महामंडळाची बऱ्हाणपूर ते नाशिक मार्गावर धावणारी एस टी महामंडळाची बस क्रमांक MH 20 BL 2656 ही बस दिनांक 3/6/2024 रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान बर्हाणपूर हून नाशिक कडे जात असताना सोग्रस फाट्याजवळ मालसाणे गावातील गतिरोधकावर पुढे चालणाऱ्या टाटा कंपनीच्या हायवा टिप्पर/डंपर या गाडीला गतिरोधकावर पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये बसचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघात इतका भीषण होता की,दोन्ही गाड्यांच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.पंधरा पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहे.घटनास्थळी वडाळीभोई पोलीस स्टेशनचे कर्मचारी पंधरा-वीस मिनिटात अपघात स्थळी दाखल होऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर काढून सोमा टोल कंपनी आणि चांदवड उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका अपघात स्थळी बोलावून पुढील उपचारासाठी जखमी प्रवाशांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात वडाळीभोई रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले.अपघातग्रस्त बस वडाळीभोई पोलीस स्टेशनला जमा करून झालेल्या अपघाताचा पुढील तपास वडाळी भोई पोलीस करत आहे.