लासलगाव महाविद्यालयात मतदान जनजागृती व मतदार नोंदणी अभियान संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, ता. ८ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती व मतदार नोंदणी अभियान कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर अतिथींच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून येवला तहसीलचे नायब तहसीलदार श्री.चांदवडकर साहेब, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे जिल्हा संयोजक श्री.अविनाश शिरसाट सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, लासलगाव येथील बी.एल.ओ. आणि रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, डॉ.उज्वला शेळके, प्रा.मारुती कंधारे, श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आदी उपस्थित होते.
प्रा.मारुती कंधारे यांनी भारत देश हा लोकशाही प्रधान देश असून लोकशाही प्रबळ करण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती होणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे प्रतिपादन केले. तदनंतर मार्गदर्शन करतांना मा.चांदवडकर साहेब, नायब तहसीलदार म्हणालेत की, शाळा महाविद्यालय ही लोक शिक्षणाचे प्रभावी माध्यम असून यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही प्रकियेत तत्परतेने सहभाग घ्यावा याकरिता वय वर्ष 18 वर्षे पुर्ण झालेल्या वा 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जूलै व 1 ऑक्टोबर रोजीच्या अहर्ता दिनांकावर 18 वर्षे पुर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवावे याकरिता मतदार नमुना फॉर्म 6 भरावा तसेच सदर फॉर्म भरतांना फॉर्म हा अचूक पध्दतीने भरावा. या फॉर्म सोबत स्वतःचे आधार कार्ड व पालकांच्या मतदान कार्डची सत्यप्रत जोडावी जेणेकरून मतदान यादीत नाव येताना इतरत्र जाणार नाही वा संबंधित मतदाराला मतदानापासून वंचित राहता येणार नाही. याशिवाय आपण सर्व विद्यार्थीमित्रांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आपल्या परिसरातील मतदानास पात्र असणाऱ्या व्यक्तीस ही कळवावे असे आवाहन मान्यवर अतिथींनी केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि बळकट लोकशाही व्यवस्था आहे परंतु या लोकशाही व्यवस्थेचा मतदार हा कणा आहे तसेच भारत हा युवकांचा देश आहे आणि या युवकांनी जास्तीत जास्त मतदान नाव नोंदणी केली पाहिजे या उद्देशाने महाविद्यालयातील तरुण-तरुणी मतदारांना निवडणुकीचे महत्त्व सांगून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रदीप सोनवणे यांनी केले व सूत्रसंचालन श्री.सुनिल गायकर यांनी केले तर आभार श्री.देवेंद्र भांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.मारुती कंधारे, श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.