जनावरे चोरणारी सहा जणांची टोळी अटकेत पावणेतीन लाखाचा मुद्देमाल,मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई,

मिरज तालुक्यातील बेडग,म्हैशाळ विजयनगर नरवाड आदि परिसरातून जनावरे चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात यश आले आहे त्यांच्याकडून चोरलेल्या चार गाई गुन्ह्यात वापरलेली वाहन असा पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती मिरजेचे पोलीस उप अधीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिली प्रतीक प्रकाश कोळी वय 21 राहणार बेडक, राकेश आण्णासो शिंदे वय 24 राहणार म्हैसाळ मूळ राहणार आरग, आकाश उर्फ बापू मारुती, मासाळ, वय 23, राहणार बेडग प्रकाश उर्फ बा पात्रा मायाप्पा मासाळ, वय 24 राहणार बेडक किशोर उर्फ अण्णा भीमा शेळके वय 21 राहणार बेडग राकेश प्रकाश आवळे व 21 राहणार, मैशाळ,अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत बेडक म्हैशाळ विजयनगर नरवाड आदि गावांमधून जनावरे चोरीला गेलेले तक्रारी वाढल्या होत्या त्यानंतर उप अधीक्षक गिल्डा यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक विशेष पथक तयार केले होते पथक चोरट्याचा शोध घेत असताना राकेश आवळे प्रतीक कोळी यांनी गायीची चोरी करून प्रसाद बिरजे याला विकल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकाने आवळे कोळी यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने बेडक म्हैशाळ नरवाड विजयनगर परिसरातून गाई तसेच अन्य जनावरे चोरून त्यातील काही विक्री केल्याची तर काही ओळखीच्या लोकांना दिल्याची कबुली दिली त्यानंतर त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली शिवाय त्यांनी चोरलेल्या चार गाई जप्त करण्यात आल्या तसेच गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती, एम एच १० सी आर, 0582, हे वाहन असा पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिरजेचे उप अधीक्षक प्रणील गिल्डा मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रणजीत, तिप्पे, हेमंत ओमासे शशिकांत जाधव सचिन मोरे प्रकाश साळुंखे अमोल ढोले महेश निकम सुनील देशमुख सुनंदा लोहार कॅप्टन गुड वाड, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली