
वेळापूर येथे संघर्ष ग्रुपच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची ६४६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी प्रमुख पाहुणे चांदवडचे नगरसेवक रविभाऊ आहिरे यांनी प्रतिमापुजन करुन आपले मनोगत व्यक्त केले,तसेच खानगाव शाळेचे शिक्षक श्री राठोड सर यांनी रोहिदास महाराज यांच्या कार्याबद्दल सांगताना देशात जातीयतेच्या विरोधात बंड उभारण्याचे हिम्मत 14 व्या शतकात रोहिदास महाराज यांनी दाखविली.मनुष्य जातीन नाही तर कर्मांने लहान- मोठा होत असतो,आपण सर्वजण समान असल्याची शिकवण संत रोहिदास महाराज यांनी दिल्याचे श्री राठोड सर यांनी सांगितले व संत कार्याची माहिती दिली. याप्रसंगी सरपंच श्री.नारायण पालवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संतोष कुटे तसेच वेळापूर ग्रामपंचायत् सदस्य दुर्गेश गरुड श्री.आबा पालवे अँड.श्री.दिलीप शिंदे ,निलेश पालवे ,जगदीश बदामे, नितीन गरुड, गणेश बदामे, रोहन गरुड, अक्षय गरुड अमोल बदामे ,मयूर बदामे ,विलास गरुड, दीपक गरुड ,शाहूल बारशे, विकी आहिरे , रमेश जाधव, शाम गुजर, राहुल गरुड, भारत बदामे ,मोहन डावरे, सागर गरुड ,जगदीश गरुड ,अजय गरुड, राहुल बदामे ,जालिंदर भागवत ,हेमंत आहेर व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.राठोड सर यांनी केले. उपस्थित ग्रामस्थांचे आभार ग्रामपंचायत सदस्य श्री.दुर्गेश गरुड यांनी मानले.