मनमाड परिसरात रापली रेल्वे गेट जवळ तिसऱ्यांदा राष्ट्रीय पक्षी मोराचा मृत्यू; लखनऊ–मुंबई पुष्पक एक्सप्रेसची धडक
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव (दि. १ ऑगस्ट) – मनमाड नजीक रापली गेट जवळ पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षी मोराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी लखनऊहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस या गाडीने, 256/F पोल नंबरजवळ, एका सुंदर मोराला जोरदार धडक दिली.
रेल्वे कर्मचारी साईनाथ भालचंद्र संसारे व JE बाळासाहेब यशवंत साहेब हे आपले ड्युटी बजावत असताना ही घटना प्रत्यक्षात बघितली व ही सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र व युवा क्रांती माहिती अधिकार संघटना उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष मा श्री भागवत झाल्टे यांना दिली झाल्टे यांनी कोणताही विलंब न लावता त्या ठिकाणी हजर होऊन वनाधिकारी साहेब RFO राहुल घुगे यांना माहिती दिली त्यांनी आपले कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवले व पंचनामा करून मोराला रेल्वे कर्मचारी व भागवत झाल्टे यांनी वनविभाग कर्मचारी यांच्या ताब्यात दिले शासकीय पद्धतीने तपासणी करून अंत्यविधी करण्यात आला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मागील काही दिवसांत ही तिसरी घटना आहे. या आधी रेल्वे तलावाजवळ व नगर चौकी गेटजवळ देखील मोरांचे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
वन्यजीव बचावासाठी नागरिकांचे मागण्या:
🔹 रेल्वे मार्गालगत कुंपण उभारणे
🔹 हायस्पीड ट्रेनसाठी संवेदनशील ठिकाणी वेग मर्यादा
🔹 मोरांच्या हालचाली असलेल्या भागात सूचना फलक व सायरन
🔹 वनविभाग आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्त योजना आखणे
“मोर म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव. तो अशा प्रकारे वारंवार मृत्युमुखी पडतोय हे अत्यंत दु:खद आहे,” असे मत निसर्गप्रेमी व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
ही घटना केवळ रेल्वे सुरक्षा व्यवस्थेचीच नव्हे, तर वन्यजीव संवर्धनाच्या गरजेची जाणीव करून देणारी आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत, हीच अपेक्षा आहे.
सदर ठिकाणी संजय दराडे नांदगाव तालुका, अध्यक्ष भागवत झाल्टे, श्री.राहूल घूगे वनपरिक्षेत्र अधिकारी,
श्री.जयप्रकाश शिरसाठ
वनपाल मनमाड,
ईरफान सैय्यद,वनसेवक
बाळासाहेब सोनवणे, वन मजूर व इतर गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते.