दुर्गेवाडी महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी वर्षावास कार्यक्रमास सुरुवात. तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर
राहुल घोलप

दुर्गेवाडी येथील समस्त बोध्द समाज व भीम क्रांती तरुण मंडळ यांच्या वतीने महाबोधी बुद्ध विहार दुर्गेवाडी या ठिकाणी दि.10/7/2025 रोजी आषाढी पौर्णिमा व वर्षावासाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली असून या वर्षावासामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचनाने वर्षावासाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी दुर्गेवाडी मधील ज्येष्ठ कार्यकर्ते आयु आनंदा सखाराम घोलप त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन व प्रबोधनात्मक सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक उपासिका यांची चांगली उपस्थिती होती वसाहत नंबर दोन मधील समाज क्रांती बुद्ध विहार दुर्गेवाडी या ठिकाणी देखील वर्षावासाच्या कार्यक्रमास चांगल्या रीतीने चांगल्या प्रकारे सुरुवात करण्यात आली याही ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महाबोधी बुद्ध विहार व समस्त बोध्द समाज दुर्गेवाडी व भिम क्रांती तरुण मंडळ दुर्गेवाडी यांच्याकडून असे आवाहन करण्यात येत आहे की वर्षावासाला सुरुवात झाली आहे तरी सर्वांनी प्रत्येक दिवशी सायंकाळी 7-00 वाजता महाबोधी बुद्ध विहार दुर्गेवाडी या ठिकाणी उपस्थित रहावे ही विनंती. हा वर्षावास काळ तीन महिने राहील