ताज्या घडामोडी
शहीद ,श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडझिरे, शाळेत आपल्या गावातील युवा उद्योजक…..
मुख्य संपादक राहुल वैराळ

- शहीद ,श्रीकांत बोडके माध्यमिक विद्यामंदिर वडझिरे, शाळेत आपल्या गावातील युवा उद्योजक. ,महाराष्ट्र पोलीस,,, श्री निवृत्ती भिमाजी गीते यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी odomas क्रीम चे वाटप करण्यात आले. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र गवत पावसाचे डबके असतात .म्हणून मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव होत असतो .त्यामुळे दिवसादेखील विद्यार्थ्यांना डासांचा त्रास सहन करावा लागत होता, म्हणून त्यावर उपाय म्हणून आम्ही आपल्या गावातील युवा उद्योजक महाराष्ट्र पोलीस .निवृत्ती भिमाजी गीते यांची भेट घेतली .आणि त्यांच्याबरोबर या समस्येसंबंधी चर्चा केली ,त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता समस्या जाणून मदत देऊ केली ,त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना odomas क्रीम देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधीची समस्या सोडविली खरंच अशा दानशूर व्यक्तीचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे म्हणून शाळेच्या वतीने त्यांचे वडील श्री भिमाजी गिते यांचा, शालेय समिती चेअरमन बाळासाहेब बोडके आणि सदस्य छबू बोडके यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि बुके देऊन सन्मान करण्यात आला प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एम .एस .सांगळे सर ,,,,,बाळासाहेब बोडके, छबू बोडके ,,,,,सांगळे भाऊसाहेब, गंगावणे मॅडम ,शिरसाट सर ,नागरे सर ,सानप सर ,राजू नवाळे आणि विद्यार्थी उपस्थित होते,,,,,,