ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
आषाढी एकादशी निमित्त श्री. देव हिरे सर यांचे अप्रतिम फलक रेखाटन..!
ज्ञानेश्वर पोटे

भाटगाव – दि. ६ जुलै २०२५ , पंढरपूर च्या विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने महाराष्ट्रातील तमाम संत वारकरी ,लहान,थोर,वृद्ध, पुरुष ,महिला, पालखी,पायी दिंड्यामधून विठ्ठलाच्या नामाचा उद्घोष करत आषाढी एकादशीला पंढरपूर येथे दाखल होतात. या विठ्ठल भक्ती सागरात समाजानं दूर लोटलेल्या किन्नर (तृतीयपंथी ) समाज वारीमधील विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन गेला. विठुरायानं वारीमधून या किन्नर समाजाला माऊली माऊली म्हणून स्वीकारलं. या विषयीचं शालेय दर्शनी फलकावर भक्तिमय व समाजप्रबोधन करणारे आशावादी फलक रेखाटन करून श्री. देव हिरे सर कलाशिक्षक , शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक यांनी आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.