आषाढी वारी निमित्ताने शाळेतील पायी दिंडी सोहळा, रिंगण आणि फुगडी ने फेडले डोळ्यांचे पारणें….
ज्ञानेश्वर पोटे

भाटगाव ता. चांदवड नाशिक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि नूतन माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या प्रांगणात आकर्षक आणि सुंदर गोल रिंगण केल्याने विध्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या डोळ्यांचे पारणें फिटले. सर्व प्रथम आकर्षक सजावट केलेल्या पालखीत ठेवलेल्या विठुरायच्या मूर्ती व ग्रंथाची पायी दिंडी गावातून काढण्यात आली.
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे श्री विठ्ठल आणि रखुमाई ची विध्यार्थ्यांनी साकारलेली हुबेहूब वेशभूषा…
शाळेच्या प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक, पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,पालक यांच्या हस्ते विठूरायची मूर्ती व ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
पालखी दिंडी सोहळ्याचे नियोजन ह. भ. प. नामदेव महाराज पोटे, ह. भ. प. म्हसू काका पोटे, मृदूंगचार्य ह. भ. प. निलेश महाराज भवर, पवन महाराज भवर, नवनाथ महाराज पवार, गणपत महाराज मोरे आदी सर्व भजनी मंडळ आणि ग्रामस्थ यांनी सहकार्य करून दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली.
या आषाढी वारी सोहळा निमित्त विध्यार्थी व पालकांनी रिंगण सोहळा व फुगडी चा आनंद घेतला.
कार्यक्रम यशस्वीते साठी शालेय व्यवस्थापन समिती आणि सांस्कृतिक विभागाने परिश्रम घेतले.