पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात २०१२ पासुन ते आज पर्यंत दंत चिकित्सकांची निर्मिती केल्या पासुन
वैभव गायकवाड

पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात २०१२ पासुन ते आज पर्यंत दंत चिकित्सकांची निर्मिती केल्या पासुन दंतचिकित्सक व एक सहाय्यक ही दोन पदे रिक्तच होती आता मात्र नुकतेच सहाय्यक पद भरले गेले आहे .
मात्र दंतचिकित्सकाची प्रतिक्षा आहे हे पद कधी भरले जाईल याकडे नागरिकांचे लक्ष लागुन आहे.
तालुक्यातील नागरिकांना तसेच रूग्नांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असुन मौखिक तपासणी व दंतचिकित्सेसाठी इतरत्र किंवा जिल्हय़ाच्या ठिकाण गेल्या शिवाय गत्यंतर नाही.
सार्वजनिक आरोग्य विभागाने जुलै २०१२ ला संचालक स्तरावर स्वतंत्र मौखिक आरोग्य सेवा कक्ष सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दंतकित्सक गट अ वर्ग २ व सहाय्यक गट ड हे पद निर्मितीसही मान्यता मिळाली असूही पेठ ग्रामीण रुग्णालयात ही दोन्ही पदे निर्माण झाल्या पासुन रिक्तच असल्याने तालुक्यातील मौखिक आजाराचे रुग्ण आरोग्य सेवे पासुन वंचित राहतात.
सर्वसामान्य जनतेच्या मौखिक आरोग्य विषयक विविध माध्यमांद्वारे जनजागृती करूनही यात दात व हिरड्यांचे आजार दंतव्यंग, कर्करोग, तोंडात आढळून येणारे मुख्य कर्करोग, मार लागल्यामुळे होणारे अस्थिभंग, दंतभंग आदी समस्यांचे प्रमाण लक्षणीय आढळून येते.
तत्कालीन झालेल्या शालेय आरोग्य तपासणी शिबिरातील उपलब्ध आकडेवारी नुसार मुलांमध्ये दंतक्षयाचे प्रमाण सुमारे ९२ % आढळून आले असून हे त्यांच्या आजाराचे प्रमाण सुमारे ६७% आहे पान मसाला गुटखा आणि धूम्रपान हे युवा पिढीत म्हणजे १४ ते १८ वर्ष वयोगटात सुमारे ६० ते ८०% आहे. यामुळेच मुख कर्करोगाच्या टक्केवारी वाढ झाली असल्याचे चित्र आहे .सध्या राज्यात दंतचिकित्सक शहरी भागात ७५ टक्के तर ग्रामीण भागात २५ते ३० टक्के दंतशल्य चिकित्सक आहेत.हे प्रमाण अतिशय विषम व विसंगत असे आहे.ग्रामीण भागासाठी मौखिक आरोग्य हे महत्वाचे असल्याने याठिकणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
काही विशिष्ट दंतोपचार हे सामान्य व्यक्तिंच्या आर्थिक परिस्थितीला न परवडणारे व सामान्य व्यक्ती शरीरात इतर आजार व दंत उपचारा याकरिता शासकीय रुग्णालयावर अवलंबून असतात.
या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य सेवेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीला मौखिक आरोग्य मिळण्याबाबत दंत विभाग अद्ययावत यंत्रसामुग्री तज्ञ मनुष्यबळ व इतर पायभूत सुविधा मिळाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दंत सहाय्यक पद जरी नियुक्त केले असले तरी दंतचिकित्सक हेही पद लवकरात लवकर नियुक्त करण्यात यावे ही मागणी जोर धरत आहे.