माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव शिक्षक दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे आज दि.५/०९/२०२३ रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती.शिक्षक दिन म्ह.साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कू.प्रांजल रसाळ (इ.१० वी) ही विद्यार्थिनी होती.
मुख्याध्यापिका म्हणून कु.गायत्री भालेराव हिने भूमिका बजावली. तर सूत्रसचालन कु.प्राप्ती गांगुर्डे हिने अतिशय छान केले.प्रथमतः सरस्वती मातेचे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन,
मढवई सर (संस्थापक अध्यक्ष)यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्री कदम सर यांनी
ऑलिंपियाड परीक्षेचे नुकतेच आयोजन केले होते.त्यात प्रथम क्रमांक कु. प्रांजल रसाळ,द्वितीय क्र. कु.प्रणिती साप्ते,तर तृतीय क्रमांक कु.तनुजा रसाळ हिने मिळविला. प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थिनीला १०००रू.रोख बक्षीस श्री कदम सर यांनी दिले.इतर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला . शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक म्हणून भूमिका बजाविणारे विद्यार्थी.
यश गुरगुडे,कार्तिक गांगुर्डे,सचिन देवरे,रायते शिवाजी,शिद्देश पवार,वैष्णव शिरसाठ,साक्षी डगळे,कल्याणी सुपेकर,
समीक्षा गांगुर्डे सविता मोरे,रसिका सुपेकर,ऋषाली कडाले,ओम शिरसाठ,ओम शिंदे ,यश डगळे, गुरगुडे रेवती,प्राची देवरे प्रणिती सांप्ते,यांनी शिक्षक म्ह.अध्यापनाचे काम केले..
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मढवई मॅडम ,श्री गलांडे सर, श्री गांगुर्डे सर ,श्री केदारे सर, श्री कदम सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले.विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व अध्यापन,अध्ययन अनुभव कथण केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गलांडे सर श्री केदारे सर श्री गांगुर्डे सर श्री दिवटे सर श्री कदम सर श्री देवडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले,
वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.