ताज्या घडामोडी
चांदवड तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयाकडून सर्व सामान्यांची आर्थिक पिळवणूक
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – चांदवड तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयात विद्यार्थी, शेतकरी यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले आणि लाडकी बहीण योजनेसाठी गरजू महिलांना लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. उत्पन्न दाखल्यासाठी शासकीय फी 33 रुपये 60 पैसे आहे, पण सेतू कार्यालयाकडून सर्व सामान्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. मात्र या कडे प्रशासनाचे लक्ष नाही.
तरी माननीय तहसीलदार साहेबांनी या कडे लक्ष दिले तर सेतू चालकांकडून सर्व सामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबेल अशी अपेक्षा आहे.