अंबानी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात नवदापत्त्यांवर भेट वस्तूंचा वर्षाव
नाशिक प्रतिनिधी

नाशिक – अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न समारंभाला दोन आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलेला आहे, अशातच काल 2 जुलै रोजी अंबानी कुटुंबाने समाजातील वंचित घटकांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सामूहिक विवाह कार्यक्रमाला मुकेश अंबानी, नीता अंबानी ,आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी ,आणि आनंद पिरामल यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते .त्याचप्रमाणे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते या विवाहाला उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांसाठी तेथील स्थानिक वारली या जमातीने पारंपारिक तारपा नृत्य सादर करून कार्यक्रमाचे लौकिक आणखीनच वाढवण्यात भर टाकली .तसेच वधू आणि वर यांना सदिच्छा म्हणून अंबानी कुटुंबाने प्रत्येक जोडप्याला सोन्याचे दागिने ,मंगळसूत्र ,अंगठ्या, नथ .जोडवी आणि पैंजण यासारखे चांदीचे दागिनेही दिले. एवढ्यावरच नव्हे तर प्रत्येक जोडप्याला एका वर्षासाठी पुरेसा किराणा सामान आणि घरगुती वस्तू भेट दिल्या .यामध्ये 36 जीवनावश्यक वस्तू भांडी , गॅस , स्टोव्ह , मिक्सर , पंखे यासारखी उपकरणे आणि गादी पलंग इत्यादी वस्तू भेट दिल्या.आणखी खास भेट म्हनुन,प्रत्येक वधुला तिचे “स्त्रीधन”म्हणुन 1.01लाख रु़ चा धनादेश देण्यात आला.