जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वर्गात आणलं बिबट्याचं पिल्लू…..
ज्ञानेश्वर पोटे

गुहागर- वाघ किंवा बिबट्याच्या नावाने कोणीही घाबरुन लांब पळतो. पण बिबट्याच्या पिल्लाला विद्यार्थी शाळेत खेळवत असल्याचा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने शाळेत घबराटीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे ह्या लहान बिबट्याचे पिल्लू लहान विध्यार्थ्यांना शाळेत आणल्याचा प्रकार आहे. आणि हे विध्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे आहे असे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, ही घटना गुहागरमधील उमराठ जिल्हा परिषद शाळेमधील घटना आहे. शिक्षकांच्या समोर बिबट्याच्या पिल्लाला विद्यार्थी अंगावर खेळवत असतानाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडिओ पाहिला तर बिबट्याला न घाबरता लहान मुलाचं असं कृत्य आश्चर्यकारक आहे. शिवाय शाळेचे शिक्षक देखील मुलांना असं करण्यापासून न थांबवता व्हिडीओ करण्यात व्यस्त होते. बिबट्याची माता पिल्लाच्या शोधात आली असती तर मोठा अनर्थ झाला असता. या घटनेने पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.