जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव तालुका चांदवड येथे कृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला उत्साहात साजरा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड तालुक्यातील भाटगांव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेतील बालगोपाळांसह गोपाळकाला साजरा करण्यात आला.दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांनी व्यवस्थित मार्गदर्शन करत गोपाळकाला दहीहंडी फोडणेसाठी गोविंदा थर कसे उभारतात त्या बद्दल माहिती दिली.त्या नुसार सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साही वातावरणात गोविंदा थर रचत, नाचगाणी करत दहीहंडी फोडली. सदर कार्यक्रम प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्र पोटे, श्री. अनिल पोटे, श्री. अशोक पवार
शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर, श्री. पवार सर, श्री. गवळी सर, सौ. गायकवाड मॅडम, सौ. बच्छाव मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, गावातील तरूण मित्र मंडळ,ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक आदी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.