
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख तसे आमदार आमश्यादादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली कोयलीविहीर या ठिकाणी तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार आमश्यादादा पाडवी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, महिला संपर्क प्रमुख विद्याताई साळी, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती शंकर पाडवी, शिवसेना नंदुरबार जिल्हा महिला संघटक रिना पाडवी, जिल्हा उपप्रमुख मंगलसिंग वळवी, के. टी. गावित, युवासेना चे जिल्हा अधिकारी ललित जाट, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नवरतन टाक, युवासेनेचे विनोद वळवी, तालुका प्रमुख नटवर पाडवी, कान्हादादा नाईक, महिला तालुका संघटक संगीता पंजराळे, सिंधुताई वसावे, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, सरपंच जवराबाई पाडवी, अक्कलकुवा शहरप्रमुख रावेंद्र चंदेल सरपंच आदी उपस्थित होते, यावेळी सूत्रसंचालन चंद्रकांत चव्हाण यांनी केले.