मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत आडगाव शाळा प्रथम
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर.

. सविस्तर वृत्त असे की, आडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सन्मानाबद्दल रयत संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी कौतिक केले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभिनय अंतर्गत आडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलला महापालिकेचे कार्यक्षेत्र गट,-ब उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले होते. गुरुवारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हे २१ लाख रुपये सन्मान चिन्ह व समान पत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात पालकमंत्री दादा भुसे यांच्या समवेत जिल्हा परिषद विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. नितीन बच्छाव उपशिक्षणाधिकारी श्री. कनोज उपस्थित होते. या सन्मान बद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत दळवी उपाध्यक्ष ॲड. श्री. भगीरथ शिंदे विभागीय अध्यक्ष श्री. आशुतोष काळे सचिव श्री. विकास देशमुख सहसचिव श्री. बी.एन. पवार डॉ. श्री. ज्ञानदेवम मस्के श्री. मेनकुदळे आदींनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक श्री. शिवबा पगार माजी प्रभारी मुख्याध्यापिका सौ. आर. बी. भवर ज्येष्ठ उपशिक्षक श्री. के. डी. बागले आदींनी अभिनंदन केले. विद्यालयातील उपशिक्षक श्री. नितीन शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले