लासलगाव महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी उदबोधन कार्यशाळेचे आयोजन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी *प्रथम वर्ष बी. ए., बी.कॉम., बी.एस.सी, बी.बी.ए (सी.ए), बी.एस.सी (कम्प्युटर सायन्स)* वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष (आयक्यूएसी) मार्फत विद्यार्थ्यांसाठी उदबोधन कार्यशाळेचे *(इंडक्शन प्रोग्रॅम)* आयोजन करण्यात आले. या उदबोधन कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आदिनाथ मोरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रा.सुनिल गायकर आणि प्रा.किशोर अंकुळणेकर यांनी ‘एबीसी आयडी कसा तयार करावा’ यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी डॉ.बाजीराव अहिरे यांनी विद्यार्थ्यांना ‘नियमित क्रेडिट कसे मिळवावे’ यावर मार्गदर्शन केले तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांनी ‘अनिवार्य क्रेडिट कसे मिळवावे’ यावर मार्गदर्शन केले, या इंडक्शन प्रोग्राम ची रूपरेषा तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयक्यूएसी समन्वयक डॉ.संजय निकम यांनी केले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना आणि महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची देखील माहिती देण्यात आली. या उदबोधन कार्यशाळेसाठी प्रथम वर्षातील जवळपास 600 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ.संजय निकम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.