ताज्या घडामोडी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमांअंतर्गत कोटमगाव विद्यालयात ध्वजारोहण —–
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर.

दि.13/08/2023 रोजी माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे सकाळी 8=00 वा.ध्वजारोहण करण्यात आले. प्रथमतः सरस्वती मातेचे व संस्थापक अध्यक्ष कै. मढवई सर यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजपुजन संस्थेचे सचिव श्री प्रतिक मढवई यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक श्री गलांडे सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री प्रतिक माणिक मढवई
हे होते. मुख्याध्यापिका श्रीमती मढवई मॅडम यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री केदारे सर श्री गांगुर्डे सर श्री गांगुर्डे सर श्री दिवटे सर,श्री डेवढे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.