
अजंग वडेल तालुका मालेगाव येथील मराठा समाजातील अल्पवयीन मुलीस वय वर्षे 8 ते 10 अपहरण करून निर्दयपणे मारून टाकण्यात आले व आरोपी माहीत असूनही पोलिसांनी अटक केलेली नाही तरी सदर घटनेचा निषेध करण्यासाठी व चांदवड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी सकाळी दहा वाजता रेस्ट हाऊस गणुर चौफुली चांदवड येथे सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही घटना फक्त माझ्याच गावची नाही तर अख्या हिंदुस्थान ला सांगणारी आहे की मानसिकता खरच एवढी नराधम झाली❓
काय चुक होती त्या निरागस चिमुरडीची
आठ वर्षाची लहान बालिका….
ही घटना कानावर पडल्यावर ह्रदय पिळवटुन गेले.
नराधम हा नराधमच असतो.लहान जिवावर अत्याचार करुन विहरीत टाकून हत्या केली.
अशा नराधमाला जर शिक्षा झाली नाही तर उद्या उठुन असे अनेक नराधम असे कृत्य करायला अजिबात घाबरणार नाहीत.
कोण तो…फार वाईट शब्द येतात अश्या लोकांसाठी,जास्त शब्दप्रयोग करु शकत नाही.अरे ती फक्त चिमुरडी कोणाची तरी मुलगी आहे,बहीण आहे.जर आज हे प्रकरण शांत झाले तर उद्या उठुन कोणीही तुमच्या आमच्या व्यक्तींवर असे करु शकतात.
निषेध हा झालाच पाहीजे.
सध्या राजकीय नेते प्रचारात बिजी राजकारणाच्या घडामोडीत त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहीजे.हे जर असच चालु राहील तर अवघड आहे. अशी प्रतिक्रिया सर्व समाजाकडून येत आहे.