नासिक जिल्ह्यात वादळाचं तांडव कांद्याच्या शेड खाली वाहने दाबले
कळवण प्रतिनिधी वैभव गायकवाड

वणी 16 मे 2024 वणी शहरात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा शेड उध्वस्त वणी शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वारा आल्याने सात ते आठ कांदा शेड उडाले असून लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे पावसामुळे वणी पिंपळगाव रस्त्यावरील काही कांद्याचे शेडाचे लाख रुपयाचे नुकसान झाले तसेच कांदे भिजल्याने मोठ्या प्रमाणात कांदा नुकसान झाले असून काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे सकाळपासून ढगाळ वातावरण होते परंतु उष्णता वाढलेली होती विजेच्या कडकडाट होऊन जोरदार पावसाची सुरुवात झाली अचानक सुरू झालेला पावसाने अनेकांनीची धांदळ उडाली जोरात वारा असल्याने काही ठिकाणी घराचे पत्र उडाले तर बाजारपेठेतील विक्रेत्यांची एकच धावपळ झाली वनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होती. शेकडो ट्रॅक्टर आलेले असल्याने अचानक आलेले पावसाने शेतकऱ्याची कांदे झाकण्याची धावपळ उडाली तसेच कांद्याच्या खळ्यावरती बांधण्यात आलेले जवळपास आठ शेड हे वादळी वाऱ्यामुळे उडाल्याने शेड मधील कांदे तसेच काही वाऱ्याने शेड पडल्याने नुकसान झाले काही ठिकाणी कांद्याच्या गाळ्यात कांदे उघड्यावर होते जोरात वारा व पावसाळ्यात काही ठिकाणी कांदे बिझले .सुमारे अर्धा तास वारा व पाऊस सुरू असल्याने झाडाच्या मोठ्या फांद्या विजेच्या तालावर पडल्याने तारा तुटल्या वनी पिंपळगाव रस्त्यावरील पारेगाव फाट्यांना विजेच्या चार ते पाच खांब पडले असून वीज पुरवठा खंडित झालेला आहे