
लासलगाव, ता. २६ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे व डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व भारताच्या संविधानाच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.मारुती कंधारे यांनी भारतीय संविधान दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची माहिती दिली तसेच सर्व शिक्षक-प्राध्यापक व विद्यार्थी यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.सुनील गायकर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.मारुती कंधारे, रासेयो +2 स्तर कार्यक्रमाधिकारी श्री.सुनिल गायकर, महिला कार्यक्रम अधिकारी श्रीमती लता तडवी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.मारुती कंधारे, श्री.सुनिल गायकर आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.