
लासलगाव –
आज दुपारपासून लासलगाव सह वेळापूर,आंबेगाव,पाचोरे,मरळगोई, टाकळी,विंचूर,डोंगरगाव,नांदगाव, नैताळे,निफाड व आजूबाजूच्या गावांत वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणात गारांसह पाऊस झाला आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांच्या द्राक्षे, कांदा, टोमॅटो, मका, गहु इत्यादी प्रमुख पिकांसह सर्व शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले व्यापाऱ्यांनी बाजार आवारावर खरेदी केलेल्या शेतीमालाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लासलगावात आलेल्या प्रभात सर्कस चा तंबू देखील वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाला त्यामुळे सर्कसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे येथील शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला असताना आजच्या बेमोसमी पाऊस व गारपीटमुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे द्राक्षांचे घड जमिनीवर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला कांदा खराब झाला आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.