ताज्या घडामोडी

सप्तशृंगी गडासह 31 गावांवर दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाची यादी तयार, गडासाठी 91 कोटींचा प्रस्ताव -आ.पवार

वैभव गायकवाड

कळवणमध्ये अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी असून लोकवस्ती आहेत. सप्तशृंगी गडावरही पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या धोका अधिक असतो. त्यातून रस्ता बंद होणे, वाहतूक कोंडी होते. तसेच भूस्खलन होऊन भराव पाहून येत असल्याच्या घटनांमुळे भविक व ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होत शक्यता अधिक असते.

 

सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव

संभाव्य धोका टाळण्यासाठी सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी विशेष बाब म्हणून 91 कोटी 20 लाखांचे तीन प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र त्यावर अद्याप कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नाही.

 

दरड कोसळण्याचा धोका असलेली गावे..

 

सप्तशृंगी गड, मांगलीदार, ततानीपाडा, जामले, कोसुर्डे, भाकुर्डे, करंभेळ, देसगाव, तिन्हळ, गांडूळ मोकपाडा, आमदर, दिगमे, खर्डेदिगर, उंबरगव्हाण, चोळीचामाळ, हनुमंतमाळ, महाल, पायरपाडा, काठरे दिगर, बोरदैवत, देरेगाव, वणी, मोहनदरी, नांदुरी, मेहदर, मुळाणे वणी, वडाळे, पिंपरी माकैड, कातळगाव, पाळे पिंप्री, अशा तब्बल ३१ गावांमध्ये माळीणसारखी दरड कोसळणे, पावसामुळे भू स्खलन होण्याच्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे.

 

संरचनात्मक स्वरूपाच्या 46 कामांसाठी 163 कोटींचा प्रस्ताव..

 

याशिवाय जिल्ह्यातील संरचनात्मक स्वरूपाच्या 46 कामांसाठी 163 कोटी 25 लाखांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. बिगर संरचनात्मक स्वरूपाचा तीन कोटी दहा लाखांच्या चार कामांचा प्रस्ताव गेल्या महिन्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्च व मे 2024 या कालावधीत 260 कोटी 65 लाखांची विविध स्वरूपाची कामे प्रस्तावित केली आहेत. प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य सरकार त्यांच्या तांत्रिक समितीकडे पाठतात. कामांची उपयुक्तता बघूनच त्यांना अंतिम मान्यता मिळते आणि निधी मंजूर केला जातो.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.