
कातरणी तालुका येवला जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी श्री.विजय कदम यांचे पुत्र जवान ऋषिकेश कदम यांचे 22/6/2024 रोजी रात्री दहा वाजता आर्मी सेंटर अहमदनगर येथे कर्तव्य बजावत असतांना अपघाती निधन झाल्याची प्राथमिक माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली.ही बातमी कातरणी व पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली,त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांचे पार्थिव 23/6/2024 रोजी संध्याकाळी उशिरा त्यांच्या मूळ गावी कातरणी येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन वर्षाचा एक मुलगा,पत्नी व भाऊ विकास विजय कदम हे आर्मी लिह लदाक उत्तराखंड येथे ड्युटी बजावत आहेत.घरी आई,वडील,आजी, आजोबा असा त्यांचा मोठा परिवार आहे.