शिवसेनेच्या तक्रारीची दखल मुंबई उप महाव्यवस्थापक नितीन मैंद साहेब यांची तात्काळ लासलगाव आगारास भेट.
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव..
शिवसेना यांचे वतीने मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिया यांना
लासलगाव बस स्थानक , डेपो मध्ये असलेल्या बसच्या संख्या वाढविण्यात याव्या व नादुरुस्त बस तात्काळ दुरुस्त कराव्या तसेच लासलगाव बस आगाराची क्षमता हि ५८ बसची होती परंतु आज रोजी केवळ ३५ बस कार्यरत आहे.नवीन बस उपलब्ध करून देण्याबाबत निफाड शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील,मा.प.स. सदस्य उत्तमराव वाघ तालुका समन्वयक केशवराव जाधव व पदाधिकाऱ्यानी तक्रार केली होती.
वरील तक्रारीची ,निवेदनाची विविध वर्तमान पत्रात नादुरुस्त बसेस बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.याची तातडीने दखल घेत दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुंबई उपमहाव्यवस्थापक नितीन मैंद,तसेच नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी तातडीने लासलगाव आगारास भेट दिली.बस स्थानक व डेपोमध्ये जाऊन समक्ष पाहणी केली.वर्कशॉप मध्ये बसेसला दुरुस्ती करिता आवश्यक साहित्य मागणी करण्याचे सूचित केले.तसेच ऑक्टोबर महिन्यातील लासलगाव डेपोच्या उत्पन्न बाबत आढावा घेतला.दिवाळी सणामध्ये लासलगाव आगाराने जादा उत्पन्न मिळविल्याबद्दल अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
यापुढे गाड्या दुरुस्ती करून ब्रेक डाऊन झाल्या नाही पाहिजे, विद्यार्थ्यांच्या प्रवाशांच्या तक्रारी होता कामा नये अशा सूचना केल्या. लासलगाव आगारास लवकरात लवकर नवीन बसेस करून देणार असल्याबाबत व्यवस्थापक यांनी माहिती दिली.ग्रामीण वाहतूक आणि शालेय विद्यार्थी यांच्या करिता फेऱ्या वाढविणे व वेळ पाळणे खुप महत्वाचे आहे. तसेच बस स्थानकामधील स्वच्छता याबाबत तक्रार येता कामा नये अशा सूचना देखील दिल्या.
बस डेपो मध्ये आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात ऑक्टोबर महिन्यात जादा आणणारे चालक,वाहक , तसेच डेपो मॅनेजर महाजन साहेब ,वाहतूक निरीक्षक श्री.उखार्डे ,व कार्यशाळा अधिक्षक श्री.कुशारे यांचा उप महाव्यवस्थापक मा.श्री.नितीन मैंद साहेब व विभागीय अरुण सिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.