कळवण तालुक्यातील दरेगाव(वणी)येथिल विठ्ठल रखुमाई मंदिराच्या परीसरात
संपादक सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड
कळवण तालुक्यातील दरेगाव(वणी)येथिल विठ्ठल रखुमाई मंदिराच्या परीसरात शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी गोरज मुहुर्तावर संत गवळी महाराज यांच्या आशिर्वादाने तुलशी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असुन याचे नियोजन गावकरी मंडळी व भोजन व्यवस्था निसर्ग सौजन्य गृपच्या वतीने करण्यात आली आसल्याची माहिती आयोजकांनी दिली.
तसेच या तुलशी विवाहची गावातून सवाद्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात येणार ! हा कार्यक्रम सलग दोन दिवस होणार असुन यासाठी शामराव महाराज(मोहनदरी) धनराज महाराज (दरेगाव) निवृत्ती महाराज काळे (चांदवड) यांचे किर्तन आयोजित केले आहे.
हा भ व्य तुलशी विवाहाचा कार्यक्रम कळवण तालुक्यातील आदिवासी गावात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असुन यासाठी दरेगावातील लहान बालकांसह महिला व तुरुण मंडळही मोठ्या उत्सहात या विवाहात सहभागी होऊन आनंद घेतात
या तुलशी विवाह सोहळ्याच्या लग्न पत्रिका देखील छापण्यात आल्या असुन गावोगाव निमंत्रण देऊन मोठ्या उत्सवात परीसरातील विठ्ठल भक्त सहपरीवारासह या तुलशी विवाहात सहभागी होत असतात.
तसेच या तुलशी विवाहच्या कार्यक्रमासाठी दानशुर व्यक्ती सहखुषीने आर्थिक स्वरुपात दान देत असतात. तर या दानशुर व्यक्तींचा कार्यक्रम प्रसंगी शाल श्रीफळ देऊन आदर सत्कार आयोजकांकडून करण्यात येतो.
या विवाहाप्रसंगी नांदुरी ,सप्तशृंगगड,अभोणा मोहनदरी,शिंधींपाडा वणी. अहिवंतवाडी. गोलदरी चामदरी पायरपाडा आदी गावांसाह जिल्ह्यातील पंचक्रोशीतील विठ्ठल भक्तांनी उपस्थिती दाखवावी असे दरेगाव ग्रामस्थांकडून आवहान केले आहे.